कोडोली येथे कोविड लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:21+5:302021-02-05T07:06:21+5:30
कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा ) ...

कोडोली येथे कोविड लसीकरणास प्रारंभ
कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा ) येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते कोविड लसीकरण शुभारंभ सोमवार झाला. आरोग्य कर्मचारी उमा पाटील यांना प्रथम लस देण्यात आली.
या रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी , कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांना दिली जाणार आहे. १२ फेब्रुवारी २०२१ अखेर पहिला डोस देणेत येणार आहे. सदर लाभार्थींना दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. कोविशिल्ड लस पुरेशी उपलब्ध असलेची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील अभिवंत यांनी दिली
वारंवार हात धुणे , मास्कचा वापर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे यापुढेही पालन करावे, असे आवाहन जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, उपजिल्हा रुग्णालय कोडोलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील अभिवंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल कवठेकर, माजी उपसभापती रवींद्र जाधव, कोडोलीचे तलाठी अनिल पोवार इ . उपस्थित होते.
२५ कोडोली लसीकरण
फोटो ओळ
कोडोली, ता. पन्हाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस शुभारंभप्रसंगी आमदार विनय कोरे, विशांत महापुरे, अमित माळी, रमेश शेंडगे,डॉ. हर्षला वेदक,डॉ. सुनील अभिवंत, डॉ. कवठेकर, रवींद्र जाधव व इतर.