शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:28 IST

‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे वेळेवर न आलेल्या सुमारे २४५ कर्मचारी व अधिकाºयांना तात्काळ कारवाई का करू नये म्हणून नोटीस बजावली.

ठळक मुद्देमहापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटकाउशिरा आल्याबद्दल २४५ कर्मचाऱ्यांना नोटिसा

कोल्हापूर : ‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे वेळेवर न आलेल्या सुमारे २४५ कर्मचारी व अधिकाºयांना तात्काळ कारवाई का करू नये म्हणून नोटीस बजावली.ज्याप्रमाणे कर्मचारी गैरहजर असल्याचे पहायला मिळाले तसे सर्व विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकारीही गैरहजर असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. सुमारे अर्धा तास आयुक्त कलशेट्टी यांनी पाहणी केली. एक एक विभाग करत त्यांनी मुख्य इमारतीतील सर्व विभाग पिंजून काढले. त्यानंतर त्यांनी शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्यांच्या सोबत कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड होते.कलशेट्टी यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेतील मुख्य इमारत व छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयाची अचानक पहाणी सुरु केली तेव्हा सत्तर टक्के कर्मचारी कार्यालयात यायचे होते, तर केवळ तीस टक्के कर्मचारी कार्यालयात येऊन स्थानापन्न झाले होते. त्यांनीही कामाला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे आयुक्त संतप्त झाले. त्यांनी तात्काळ बायोमेट्रीक मशिनवरील हजेरीच्या नोंदी प्राप्त करून घेण्याच्या सूचना कामगार अधिकारी चल्लावाड यांना दिल्या.बायोमेट्रीक हजेरी तपासली असता २४५ कर्मचारी हे सकाळी १० वाजून १० मिनिटानंतर आल्याचे दिसून आले. या सर्वांना तातडीने आयुक्तांनी कारवाई का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस लागू केली. या कर्मचाºयांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.शुक्रवारी जे कर्मचारी वेळेत पोहोचले नाहीत त्या सर्वांची दि. ४ , ५ , ६ फेब्रुवारी रोजीची बायोमेट्रीक हजेरी तसापावी तसेच कोण किती वाजता आले याची माहिती संकलित करा, असे आयुक्तांनी सांगितले आहे. या तीन दिवसांत जे जे कर्मचारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी आले असतील त्यांची एक दिवसाची किरकोळ रजा मांडण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागास दिले आहेत.

प्रशासनावर वचक राहिला नाहीकोणीही आयुक्त आले की त्यांचा महापालिकेच्या कोणत्याही विभागाशी थेट संबंध येत नाही. आला तरी प्रत्यक्ष कधी भेट देण्याचा कोणी आयुक्त प्रयत्न करत नव्हते. फार फार तर नगररचना विभागात एखादी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे कर्मचारी आळशी बनले होते. प्रशासनावर कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक नसल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

जेवून, झोपून कर्मचारी येतातमहापालिकेतील कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक राहिला नसल्यामुळे अनेक कर्मचारी दुपारी दीड वाजता घरी जाऊन जेवून तसेच तासभर झोपून दुपारी कार्यालयात यायचे. त्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही सवयच बनून गेली होती.

काही कर्मचारी सकाळी वेळेवर येऊन बायोमेट्रीक हजेरी मांडून जे बाहेर पडायचे ते सायंकाळीच पुन्हा हजेरी मांडायला यायचे. तासाभरात कार्यालयातून बाहेर पडत असत. कोण काय करतो, कोठे जातो याचा कसलाही ताळतंत्र राहिलेला नाही. कसलीही पद्धत येथे राहिलेली नाही.

तीन दिवसाला एक रजा खर्ची टाकणारकार्यालयात उशिरा येणे आयुक्तांनी गांभीर्याने घेतले असून, जानेवारी महिन्यातील सर्वच कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी तपासण्यास कामगार अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तीन दिवसाला एक याप्रमाणे जानेवारी महिन्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची रजा खर्ची टाकण्यात येईल.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर