Commissioner ... solve the water problem | आयुक्तसाहेब...पाण्याचा प्रश्न सोडवा, भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणी

आयुक्तसाहेब...पाण्याचा प्रश्न सोडवा, भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणी

ठळक मुद्देभक्तिपूजानगरमधील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणीसहा वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा

 कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी शुक्रवारी केली.

भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारक महापालिकेचे पाण्याच्या बिलासह सर्व कर व्यवस्थितपणे जमा करीत आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून अपार्टमेंटमध्ये पाण्याची समस्या आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार, निवेदन देऊनही न्याय मिळालेला नाही. पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे.

आता तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घालून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा. पाच दिवसांत यावर मार्ग काढला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. यावर तातडीने पाण्याचा प्रश्न सोडवू. दरम्यान, महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करू, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली.


 

Web Title: Commissioner ... solve the water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.