कमर्शिअल बँकेस २ कोटी ८४ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:56+5:302021-04-06T04:23:56+5:30
कोल्हापूर : येथील दी कमर्शिअल को-ऑप बँकेस आर्थिक वर्षात २ कोटी ८४ लाखांचा निव्वळ नफा झाला. नफा मिळवताना एनपीएचे ...

कमर्शिअल बँकेस २ कोटी ८४ लाखांचा नफा
कोल्हापूर : येथील दी कमर्शिअल को-ऑप बँकेस आर्थिक वर्षात २ कोटी ८४ लाखांचा निव्वळ नफा झाला. नफा मिळवताना एनपीएचे प्रमाण ०.५७ टक्के इतके अल्प राखण्यात बँकेला यश मिळाल्याची माहिती अध्यक्ष गौतम जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, गेले वर्षभर कोरोना महामारीने जगभरात उच्छाद मांडल्यामुळे लाॅकडाऊनसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. या काळात व्यवसाय, उद्योग, व्यापार, बांधकाम आदी क्षेत्रांना जबर धक्का बसला, तरीदेखील बँकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व शिपाई वर्गाने बँकेचे कामकाज सुरळीत ठेवून ग्राहकांना सेवा दिली. त्यामुळे कर्जदार, ठेवीदार, बचतधारक, सभासदांनी आपुलकीने बँकेशी नियमित व्यवहार पाळून सहकार्य केले. संकटातून मार्ग काढीत बँकेने ही कामगिरी बजावली. या आर्थिक वर्षात बँकेने ढोबळ नफा ८.३० कोटी मिळवला असून निव्वळ एन.पी.ए. ०.५७ टक्के इतका राखला आहे. ठेवी २८५ कोटी ६० लाख, कर्जे १६७ कोटी ३० लाख, सी.डी. रेशो ५८.५८ टक्के अशी बँकेची सध्याची सांपत्तिक स्थिती आहे. हे यश सभासद, खातेदार, बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांंमुळे शक्य झाले आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल शहा, संचालक भाऊसाहेब सावंत, रामराव पवार, अमोल निगडे, अरुण गावडे, ॲड. प्रशांत शिंदे, सुरेश इंगवले, रामचंद्र कुंभार, प्रा. अमरसिंह शेळके, राजेंद्र डकरे, रंजना वायचळ, शर्मिला कणेरकर, तज्ज्ञ संचालक दीपक गाडवे, राजीव रणदिवे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे उपस्थित होते.