कोल्हापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे दिवाळीत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. दोन हजार स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला.
संचालक गजानन धामणेकर, क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना अनुक्रमे २० ग्रॅम चांदीची १० नाणी, १० ग्रॅम चांदीची १० नाणी आणि १० नग बाउल्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ऋतुराज दळवी यांनी सूत्रसंचालन केले, तर सहा. क्षेत्रिय सहा. व्यवस्थापक आर. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी विपणन विभागातील व्यवस्थापक अभयसिंह जमाले पाटील, अवधूत जांभळीकर, सदानंद भोसले उपस्थित हेातेे.
स्पर्धेचा अनुक्रमे शाखानिहाय निकाल असा : दसरा चौक-वनिता सावंत, वैशाली गिड्डे, ऋतुजा घराळ, बागल चौक शाखा -श्वेता खाडे, सानिका खाडे, श्रद्धा सरतकर, महाद्वार रोड- तेजस्विनी घाडगे, श्रावणी इंगवले, गौरी कदम, आपटेनगर-प्रियांका झेंडे, मृणाली गंगाधरे, निकीता कोकरे.
मंगळवार पेठ-सीमा कवठेकर, कृष्णावली शेळके, नंदा हावळ, शनिवार पेठ-निकिता ठीमगिरी, ऋतुजा कणसे, विद्या पाटील,
आर. के. नगर-रसिका घुगरे, तन्वी आवटे, तुलसी दुर्गुळे, कळंबा-शिवानी किलकिले, स्वाती धुळे, सोनाली पाटील.
पाचगाव-गीतांजली कोकाटे, ऋतुजा वाडकर, रोहिणी गोंधळी उचगाव-उमेश कदम, समीक्षा पाटील, उपासना सुतार.
१४१२२०२० कोल लोकमान्य
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे दिवाळीत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना संचालक गजानन धामणेकर, क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.