आईच्या स्मृतिदिनी पोवार कुटूंबीयांकडून स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:28+5:302021-02-05T07:06:28+5:30
लोकमत न्यू्ज नेटवर्क कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील संजय पोवार यांनी आई लक्ष्मी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी रक्तदान ...

आईच्या स्मृतिदिनी पोवार कुटूंबीयांकडून स्तुत्य उपक्रम
लोकमत न्यू्ज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील संजय पोवार यांनी आई लक्ष्मी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिरासह इतर स्तुत्य उपक्रम राबविले. स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नातेवाईकांबरोबरच गावातील तरुणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
पोवार हे स्वत: रक्तपेढीत कामास असल्याने रक्ताचे महत्त्व व सध्याची गरज याची माहिती त्यांना आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने आईच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये ६५ जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. प्रकाश गाढवे, सांगरूळचे माजी उपसरपंच सचिन लोंढे, श्रीदेवी ठाणेकर, अनुप्रिया शेळके, राहुल जाधव, अक्षय पाटील, सर्जेराव सुर्वे, संदीप पोवार आदी उपस्थित होते. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्ताची काहीसी टंचाई भासते, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व कार्यक्रमांचे औचित्य साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले तर रक्त टंचाईचा प्रश्न कायमचा संपेल, असे संजय पोवार यांनी सांगितले.