शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोम्बिंग ऑपरेशन; ५३ जण ताब्यात, हद्दपारीतील चार गुन्हेगारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:02 IST

जिल्ह्यात सर्वत्र एकाचवेळी कारवाई, अधिकाऱ्यांसह फौजफाटा रस्त्यावर

कोल्हापूर : पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्यात रविवारी (दि. १६) रात्रीपासून ते सोमवारी (दि. १७) पहाटेपर्यंत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत जिल्ह्यातील ५३ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. त्यात हद्दपारीचे उल्लंघन केलेल्या चार गुन्हेगारांचा समावेश आहे. अवैध धंद्यांवरही सामूहिक कारवाया करण्यात आल्या.आषाढ अमावास्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यात सर्वत्र एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी पहाटेपर्यंत ३९ ठिकाणी नाकाबंदी करून १६४१ वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ३४२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर मोटार वाहन कायद्यानुसार नऊ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले. मद्यप्राशन करून वाहन चालवणारे पाच वाहनचालक सापडले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना एक लाख एक हजार ४३० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी ५३ हॉटेल्स आणि लॉजचीही तपासणी केली.कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले ५३ गुन्हेगार मिळाले. त्यात हद्दपारीचे उल्लंघन केलेल्या चार गुन्हेगारांचा समावेश आहे. जुगार आणि मटका अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाया केल्या. याप्रकरणी २१ संशयितांवर कारवाई केली, तर एक लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे, उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

या गुन्हेगारांवर झाली कारवाई

हद्दपारीचे उल्लंघन करणारे अजित अनंत नाडगौडा (रा. फुलेवाडी, तिसरा बस स्टॉप, कोल्हापूर), धीरज राजेश शर्मा (रा. पाचगाव, ता. करवीर), नासीर कलंदर बागवान (रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) आणि स्वप्निल सुनील घाडगे (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

फौजफाटा रस्त्यांवरपोलिस अधीक्षक - ०१अपर पोलिस अधीक्षक - ०२उपअधीक्षक - ०६निरीक्षक, सहायक निरीक्षक - ४०पोलिस अंमलदार - १५८होमगार्ड - ०९

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस