कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल चक्क दे येथे पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांच्या संयुक्त पथकाने छापा घातला. या कारवाईत देशी, विदेशी मद्य, बिअर, मोटर सायकल आणि रोख रक्कम 50 हजार 790 असा एकूण 2 लाख 64 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.विधानसभा निडणूक आचारसंहिता आणि गांधी सप्ताहनिमित्त आजच्या ड्राय डे च्या दिवशी कबनूर मधील हॉटेल चक्क दे येथे छापा घातला. या कारवाईत अशोक देवाप्पा पिंपळे (रा. कबनूर, ता. हातकणंगले) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, अतूल पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक गणपती हजारे, जवान सुभाष कोले, विलास पवार, विजय माने, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक इश्वर ओमाशे यांचे पथक व स्थिर निरीक्षक पथकाचे प्रमुख सचिन पाटील, दिलीप पोवार यांनी ही कारवाई केली.अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
पोलीस, भरारी पथक आणि एसएसटीचे कबनुरमध्ये संयुक्त छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:59 IST
कबनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल चक्क दे येथे पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांच्या संयुक्त पथकाने छापा घातला. या कारवाईत देशी, विदेशी मद्य, बिअर, मोटर सायकल आणि रोख रक्कम 50 हजार 790 असा एकूण 2 लाख 64 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस, भरारी पथक आणि एसएसटीचे कबनुरमध्ये संयुक्त छापा
ठळक मुद्देपोलीस, भरारी पथक आणि एसएसटीचे कबनुरमध्ये संयुक्त छापारोख सकमेसह 2 लाख 64 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त