लक्षतीर्थ वसाहतीमध्ये साडेतीन हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:31 IST2019-07-18T17:30:28+5:302019-07-18T17:31:04+5:30

कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे विद्यालयासमोर चोरट्याने बंद घराचे कुलूप बनावट चावीने काढून घरातील सुमारे साडेतीन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

In the colonial Colony, three and a half thousand theft | लक्षतीर्थ वसाहतीमध्ये साडेतीन हजारांची चोरी

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये साडेतीन हजारांची चोरी

ठळक मुद्देलक्षतीर्थ वसाहतीमध्ये साडेतीन हजारांची चोरीलक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे विद्यालयासमोर चोरट्याने बंद घराचे कुलूप बनावट चावीने काढून घरातील सुमारे साडेतीन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना बुधवारी (दि. १७) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी आक्काताई श्रीपत सुतार (वय ६०, रा. मूळ गाव उत्तूर, आजरा; सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, आक्काताई सुतार ह्या लक्षतीर्थ वसाहतीमध्ये डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या घरी भाड्याने राहतात. मंगळवारी (दि. १६) त्या बाहेरगावी गेल्या होत्या. बुधवारी घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने बनावट चावीने काढून आत प्रवेश केला; तसेच घरात आलेल्या पत्र्याच्या पेटीची कडी उचकटून पेटीतील स्टीलच्या डब्यात ठेवलेले रोख १००० रुपये तसेच दोन ग्रॅम सोन्याच्या दोन रिंगा, दोन ग्रॅम सोन्याचे दोन बदाम, एक चार्जिंगची बॅटरी असा सुमारे ३६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 

 

Web Title: In the colonial Colony, three and a half thousand theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.