शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका आणखी पाच दिवस, कोल्हापुरात १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:22 IST

सध्याची थंडी कशामुळे?

कोल्हापूर : सध्या जाणवत असलेली कडाक्याची थंडी पुढील पाच दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच थंडी जाणवणार आहे.कोल्हापुरात सोमवारी पहाटे पाच वाजता कमाल २८.६ आणि किमान १३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा १.६ इतक्या अंश सेल्सिअसने खालावले आहे. त्यामुळे लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट जाणवत आहे. शहरात आणि लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.सध्याची थंडी कशामुळे?सध्या उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात नाही. दोन पश्चिमी झंजावात काही दिवसांच्या गॅपमुळे, अगोदरच झालेल्या बर्फ वृष्टीवरून ताशी २५ ते ३० किमी वेगाने पूर्व दिशेकडून पूर्वीय अतिथंड वारे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावत आहे, शिवाय राज्यात आकाश निरभ्र आहेच. याशिवाय महाराष्ट्र सहित संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात ४ ते ६ हेक्टापास्कलने वाढ होवून १०१६ ते १०१८ हेक्टापास्कल अशा एकसमान आणि एकजिनसी हवेच्या दाब उत्तर भारताबरोबर सध्या महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे, त्यामुळे हे वातावरण सध्या चौफेर थंडीला अनुकूल आहे.शनिवारपासून थंडी थोडी कमी होणारवारा वहन पॅटर्नमध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार दि. २२ नोव्हेंबरपासून सध्यापेक्षा केवळ काही अंशी थंडी कमी होण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Shivers: Cold Snap to Grip Region for Five More Days

Web Summary : Kolhapur experiences intense cold; temperatures dipped to 13°C. The cold wave, driven by northern winds and clear skies, will persist for five days. Relief expected from Saturday, predicts meteorologist.