दिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 07:11 PM2019-06-11T19:11:10+5:302019-06-11T19:12:19+5:30

कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. ​​​​​​​

Cloud cover throughout the day, rain in the evening | दिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊस

कोल्हापूरात मंगळवारी दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देदिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊसजखीमपेठ मार्ग माडेकरपर्यंत, तर केळीवाडी मार्ग बारवेपर्यंत अंशत: बंद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. गेली दोन दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली, तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले.

वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १९.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक चार मिलिमीटर पाऊस भुदरगड तालुक्यात झाला. गडहिंग्लज, राधानगरी, करवीर, पन्हाळा, हातकणंगले व आजरा तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद झाली.

मान्सूनपूर्व पावसाने भुदरगड तालुक्यातील जखीमपेठ मार्ग माडेकरपर्यंत, तर केळीवाडी मार्ग बारवेपर्यंत अंशत: बंद झाला. रस्त्यावर चिखल झाल्याने दलदलीतून वाहतूक करता येत नसल्याने एस. टी. वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

 

Web Title: Cloud cover throughout the day, rain in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.