दिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:12 IST2019-06-11T19:11:10+5:302019-06-11T19:12:19+5:30
कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या.

कोल्हापूरात मंगळवारी दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. गेली दोन दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली, तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले.
वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १९.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक चार मिलिमीटर पाऊस भुदरगड तालुक्यात झाला. गडहिंग्लज, राधानगरी, करवीर, पन्हाळा, हातकणंगले व आजरा तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद झाली.
मान्सूनपूर्व पावसाने भुदरगड तालुक्यातील जखीमपेठ मार्ग माडेकरपर्यंत, तर केळीवाडी मार्ग बारवेपर्यंत अंशत: बंद झाला. रस्त्यावर चिखल झाल्याने दलदलीतून वाहतूक करता येत नसल्याने एस. टी. वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.