शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीला लागले बोनसचे वेध

By admin | Updated: October 17, 2014 22:55 IST

६५ हजार कामगारांना ११० कोटी रुपये मिळणार : यंत्रमाग कामगारांना १६.६६ टक्के बोनस

राजाराम पाटील - इचलकरंजी --निवडणुकीचा हंगाम संपल्यामुळे आता वस्त्रनगरीला दीपावली बोनसचे वेध लागले आहेत. वस्त्रोद्योगातील सायझिंग, यंत्रमाग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा घटक उद्योगांत असलेल्या ६५ हजार कामगारांना ११० कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. इचलकरंजी हे सुमारे दीड लाख यंत्रमाग व आॅटोलूमचे वस्त्रोद्योगातील प्रमुख केंद्र आहे. येथे यंत्रमाग क्षेत्रामध्ये कामगारांची संख्या ५० हजार असून, त्यामध्ये यंत्रमाग कामगार, कांडीवाला, जॉबर, दिवाणजी, आदींचा समावेश आहे. मागील वर्षी यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये यंत्रमाग कामगारांना १६.६६ टक्के बोनस देण्याचा करार झाला आहे. त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांना १५ ते १७ हजार रुपये बोनस मिळणार असून, कांडीवाल्यांना १२ ते १४ हजार, जॉबर व दिवाणजी यांना १८ ते २० हजार रुपये बोनस मिळेल. साधारणत: ही रक्कम ८५ कोटी रुपये भरते.आॅटोलूम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या पगाराप्रमाणे १६.६६ टक्के बोनस मिळेल. या क्षेत्रातील कामगारांची संख्या सुमारे सात हजार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष कामगाराबरोबर कांडीवाला, जॉबर, आईलर, शिफ्ट जॉबर, आदींचा समावेश होतो. यांना सुमारे १५ ते १७ हजार रुपये बोनसपोटी मिळतात. ही रक्कम सुमारे १२ कोटी रुपये होते.  सायझिंग क्षेत्रामध्ये १७० कारखाने असून, त्यामध्ये तीन हजार कामगार कार्यरत आहेत. या कामगारांमध्ये सायझर, बॅक सायझर, वार्पर, फायरमन, दिवाणजी, हमाल, आदींचा समावेश आहे. या कामगारांना १४ ते १८ हजार रुपये बोनसपोटी मिळतील. ही रक्कम साधारणत: पाच कोटी रुपये होते.प्रोसेसर्स उद्योगात २५ पॉवर प्रोसेसर्स आणि सुमारे ५० हँड प्रोसेसर्स आहेत. सुमारे तीन हजार कामगार येथे काम करतात. त्यांना १० हजार ते १५ हजार रुपये इतका बोनस मिळतो आणि ही रक्कम चार कोटी रुपये होते. याचबरोबर सूत व कापड वाहतूक करणारे सुमारे चार हजार हमाल आहेत. त्यांना त्यांच्या कामानुसार १५ ते २० टक्के बोनस मिळत असतो. ही रक्कम पाच कोटी रुपये होते.महिलांनासुद्धा १५ कोटी रुपयांचा बोनसवस्त्रोद्योगामध्ये महिला कामगारांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. प्रामुख्याने कांडीवाले, प्रोसेसर्स आणि गारमेंट उद्योगामध्ये महिला वर्ग आहे. घरकामाचा गाडा ओढत या महिला या क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या कुटुंबाला त्या आर्थिक मदत करीत असतात. अशा महिला कामगारांची संख्या सुमारे १५ हजार आहे. त्यामुळे महिला कामगारांनासुद्धा १५ कोटी रुपयांचा बोनस मिळतो.ंतीन दिवसांत ११० कोटी रुपये मिळणारयंत्रमाग व आॅटोलूम कामगारांबरोबर प्रोसेसिंग व सायझिंग उद्योगातील कामगारांच्या हातात २० ते २२ आॅक्टोबर या तीन दिवसांत ११० कोटी रुपयांची रक्कम पडणार आहे. बोनसची रक्कम हातात मिळाल्यानंतर संबंधित कारखाने बंद होतात आणि त्यानंतर ते साधारणपणे दीड ते दोन आठवड्यानंतर उघडले जातात. ८ नोव्हेंबला पुन्हा वस्त्रनगरीची धडधड पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.