शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरील लिंक क्लिक केली अन् सात लाख गायब, कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:14 IST

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनीलाही तीन लाखांचा गंडा

कोल्हापूर : मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्याने कोल्हापुरातील एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला सात लाख रुपयांचा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला. तर सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपये लंपास केले आहेत. दोन्ही वेगवेगळ्या घटनांत सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नाही, मात्र दोन दिवसांत देण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सात लाख रुपये गेलेली संबधित व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर एक लिंक आली. यामध्ये काही माहिती असू शकते, या उद्देशाने त्यांनी ती पाहण्यासाठी खुली केली. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या बॅंकेतील वेगवेगळ्या खात्यांतून सात लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. अचानक झालेल्या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी संबधित आलेली लिंक आणि बँकेतील खात्याची माहिती सायबर यंत्रणेला दिली. त्यानंतर सायबरने त्यांची बॅंकेतील खाती गोठवली.दुसऱ्या एका घटनेत सायबर गुन्हेगारांनी एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील आहे. एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शुल्क भरण्यासाठी तिने खात्यावर रक्कम भरून ठेवली होती. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दोन दिवसांत तक्रार देणार आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापुरातील सायबर सेलकडूनही होत आहे. ऑनलाइन ॲपवर याबाबतची तक्रार आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस