शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

स्वच्छता मोहिमेने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 4:09 PM

दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून मुख्य सोहळा होणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छता मोहिमेने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरवातहजारो हातांनी दुर्गराज रायगड स्वच्छ, बुधवारी मुख्य सोहळा :गडपूजन

प्रवीण देसाई-रायगड :  दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून मुख्य सोहळा होणार आहे.मंगळवारी सकाळी ७ वाजता  चित्त दरवाजा येथे रायगड विकास प्राधिकरणतर्फे आयोजीत दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीमेची सुरुवात करण्यात आली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व संयोगीताराजे, शहाजीराजे छत्रपती, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुलकर, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सचिव अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेला सुरवात झाली.

हजारो शिवभक्तांच्या हातांनी गड बघता बघता चकचकीत करण्यात आला. होळीचा माळ येथे या मोहिमेचा समारोप झाला. दुपारी १२:३० वाजता गडावरील जिल्हापरिषदेच्या विश्रामगृह परिसरात अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याचे नेटके नियोजन केले.दुपारी ३:३० च्या सुमारास खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी शिवभक्तांसमवेत गडावर  चढण्यास सुरुवात केली. पर्यावरण रक्षणाचा संदेशजागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणुन वृक्ष रोपन व संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रायगडाचा पायथा येथे झाडांच्या बीयांची उधळण करण्यात आली.

गड पूजन रायगड जवळील २१ गावच्या पंचक्रोशीतील सरपंच व शिवभक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत  दुपारी ४.३० वाजता नगारखाना येथे गडपूजनाचा कार्यक्रम झाला.उतखननातील वस्तूंचे प्रदर्शनगडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे हत्तीखाना परिसरात आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता    रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे  छत्रपती यांच्या हस्ते उदघाटन झाले. पुरातन भांडी यासह विविध वस्तू पाहण्यासाठी गर्दी झाली होती.मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकेगडावरील होळीचा माळ येथे मावळ्यांच्या मर्दानी खेळाच्या थरारक प्रात्यक्षिकाना  सायंकाळी ६.३०वाजता सुरवात झाली. यानंतर सायंकाळी ७ वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम झाला.यामध्ये कोल्हापूरसह राज्यभरातून आलेल्या शाहिरांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

संभाजीराजेंचा शिवभक्तांशी संवादराजसदर येथे रात्री ८ वाजता संभाजीराजे छत्रपती यांचा शिवभक्तांशी थेट संवादाचा कार्यक्रम झाला.यामध्ये शिवभक्तानी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली.कीर्तन, जागर अन गोंधळाने रात्र जागलीशिरकाई मंदिर येथे रात्री ८:३० वाजता गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम झाला.  तसेच जगदिश्वर मंदिर येथे रात्री ९ वाजता जगदिश्वराची वारकरी संप्रदायाकडुन किर्तन ,जागर व काकड आरती असा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजसदर येथे रात्री ९ वाजता राजसदर येथे ही रात्र शाहीरांची हा शाहिरी सांस्कृतिक कार्यक्रम झाला.ही रात्र कीर्तन, जागर अन गोंधळाने जागली. बुधवारी कार्यक्रमात

  1. सकाळी ६ वाजता गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण
  2. सकाळी ६ वाजता राजसदरेवरील शाहीरी कार्यक्रमास सुरुवात.
  3. सकाळी ८ वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम.
  4. सकाळी ९.३० वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे राजसदरेवर आगमन होणार आहे.
  5. सकाळी ९.५० वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन होणार आहे.
  6. सकाळी १०.१० वाजता छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते अभिषेक होणार आहे.
  7. सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक व पुष्पहार अर्पण सोहळा होणार आहे.
  8. सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.
  9. सकाळी ११.०० वाजता राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
  10. दुपारी १२.०० वाजता कार्यक्रमाची सांगता जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती शिवाजी महाराज समाधीचे दर्शनाने होणार आहे.
टॅग्स :Raigadरायगडkolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज