श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:41 IST2020-01-07T13:38:53+5:302020-01-07T13:41:41+5:30
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम
ठळक मुद्देश्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आर.ओ.सिस्टीम बसवण्यासाठी निधी
कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी रुग्णालयात येणाऱ्या लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ठिकठिकाणी आर.ओ.सिस्टीम बसवण्यासाठी खा. संभाजीराजेंच्या कडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, एनएसएसचे विद्यार्थी व छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.