आजरा : आजरा - आंबोली महामार्गावर आल्याचीवाडीजवळील धोकादायक वळणावर टेम्पो झाडाला धडकून झालेल्या अपघातात क्लिनर सुमित भाऊ पाटील (वय २०, रा. घाटकरवाडी, ता. आजरा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ट्रकचालक राज आनंदा कांबळे (वय २१ रा. शिरवड ता. कराड) हा गंभीर जखमी आहे. अपघातात ट्रकचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद आजरा पोलिस ठाण्यात झाली आहे.आजरा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधून गोव्यातून पेपर रोल भरून सुमित व राज बुधवारी रात्री घाटकरवाडी येथे आले होते. रात्री मुक्काम करून गुरुवारी सकाळी ९ वा. घाटकरवाडीतून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना आल्याचीवाडीजवळील धोकादायक वळणावर चालक राज कांबळे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याकडेला असलेल्या झाडाला जोराने धडकला. धडक इतकी जोराची होती की त्यामध्ये ट्रकचा क्लिनर सुमित पाटील हा जागीच ठार झाला तर चालक गाडीत अडकून बसला होता.गॅस कटर व डोझरच्या साहाय्याने चालक राज कांबळे याला बाहेर काढण्यात आले. राज कांबळे याला उपचारासाठी गडहिंग्लज येथे दाखल केले आहे. दुपारी सुमित पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर घाटकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे.अपघातामुळे वाहतूक ठप्प व परीक्षार्थींची अडचणअपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. बारावीचे ३२ परीक्षार्थी त्यामुळे अडकून बसले होते. आजरा महाविद्यालयातील शिक्षकांनी मिळेल त्या वाहनाने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणण्याची व्यवस्था केली.वडिलांपाठोपाठ भावाच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्काकोरोनामध्ये वडील भाऊ पाटील यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटूंब सावरत असतानाच मोठा भाऊ सुमितचा आज अपघाती मृत्यू झाला. आई व भावांना मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : A cleaner died in an accident on the Ajra-Amboli highway near Kolhapur after a tempo hit a tree. The driver was seriously injured. The accident caused a traffic jam, delaying students going for exams.
Web Summary : कोल्हापुर के पास आजरा-अंबोली राजमार्ग पर एक टेम्पो के पेड़ से टकराने से एक क्लीनर की मौत हो गई। चालक गंभीर रूप से घायल हो गया। दुर्घटना के कारण ट्रैफिक जाम हो गया, जिससे परीक्षा देने जा रहे छात्र देर हो गए।