शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:07 IST

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले व सागर कोळी यांच्यातील झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी आलेल्या कोळी गटाचे ...

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले व सागर कोळी यांच्यातील झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी आलेल्या कोळी गटाचे समर्थक पोलिस ठाण्यासमोरच काले याना प्रचंड हाणामारी केली . जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.याबाबत अधिक माहिती अशी, दत्तवाड येथे नूर काले व ग्रामपंचायत सदस्या रेखा कोळी यांच्यात मोठा वाद आहे. गुरुवारी कोळी यांचे पती सागर कोळी व नूर काले यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळी काले याने कोळी याला मारहाण केल्याने रेखा कोळी यांनी काले याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी कोळी समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते. याच दरम्यान नूर कालेही पोलिस ठाण्यासमोर येताच कोळी समर्थकांनी काले याला पोलिस ठाण्यासमोरच बेदम मारहाण केली. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पा़गविले त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पोलिस ठण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रोहीनी सोळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त होता. दोन्ही गटांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस