अनलॉकच्या सलग दुसऱ्या दिवशी शहर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:03 IST2021-07-06T19:01:52+5:302021-07-06T19:03:24+5:30
CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आणखीन भर पडली. कोरोनाला मानगुटीवर घेऊनच कोल्हापूरकरांनी मंगळवारी दुपारी चारपर्यंत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. खाऊगल्ली ते सराफ दुकाने सर्वत्र लोक तुटून पडल्यासारखे चित्र होते, याला अपवाद फक्त हॉटेलचा राहिला. तेथे केवळ पार्सल सेवा असल्याने गर्दी नव्हती.

अनलॉकच्या सलग दुसऱ्या दिवशी शहर रस्त्यावर
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आणखीन भर पडली. कोरोनाला मानगुटीवर घेऊनच कोल्हापूरकरांनी मंगळवारी दुपारी चारपर्यंत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. खाऊगल्ली ते सराफ दुकाने सर्वत्र लोक तुटून पडल्यासारखे चित्र होते, याला अपवाद फक्त हॉटेलचा राहिला. तेथे केवळ पार्सल सेवा असल्याने गर्दी नव्हती.
व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी सरसकट दुकाने सुरू करण्याची विशेष सवलत कोल्हापूर शहरापुरती मिळाली आहे. अनावश्यक गर्दी करणार नाही, नियमांचे पालन करणार, असे व्यापाऱ्यांनी सांगून देखील प्रत्यक्षात सोमवारपासून दुकाने सुरू झाल्यापासून कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, याचाच विसर पडल्यासारखी शहरात स्थिती आहे.
मंगळवारीदेखील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड या प्रमुख व्यापारी मार्गांवर हेच चित्र कायम होते. जिकडे नजर टाकेल तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. विशेषत: कपड्यांच्या दुकानात गर्दी जास्त दिसत होती. याशिवाय भांडी, सौंदर्य प्रसाधनासह किरकोळ वस्तूंच्या दुकानातही बऱ्यापैकी वर्दळ होती.
जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने अडीच महिन्यांपासून बंद असल्याने बरेचसे साहित्य मिळण्यात अडचणी येत होत्या. मागच्या दाराने गेल्या महिनाभरापासून व्यापारी मागणीप्रमाणे ग्राहकाला माल पुरवत असले तरी त्यालाही मर्यादा येत होत्या.