शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

ऑनलाईन घरफाळा भरण्याकडे नागरिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 3:07 PM

Muncipal Corporation, tax, kolhapurnews तासभर रांगेत उभे राहून घरफाळा भरण्यापेक्षा तो ऑनलाईन भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत महानगरपालिकेकडे पाच कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन घरफाळा भरण्याच्या सुविधेचा १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला.

ठळक मुद्देऑनलाईन घरफाळा भरण्याकडे नागरिकांचा कलआठ महिन्यांत घरबसल्या भरले साडेपाच कोटी

कोल्हापूर : तासभर रांगेत उभे राहून घरफाळा भरण्यापेक्षा तो ऑनलाईन भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत महानगरपालिकेकडे पाच कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन घरफाळा भरण्याच्या सुविधेचा १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला.महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये शहरातील ५९ हजार ८८९ मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्राकडे २८ कोटी ७६ लाख १४ हजार १३४ रुपयांच्या घरफाळ्याची रक्कम जमा केली, तर १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी ऑनलाईनद्वारे पाच कोटी ५१ लाख ६७ हजार ८८६ रुपयांच्या घरफाळ्याची रक्कम जमा केली.कोरोनामुळे महापालिकेवर आर्थिक ताण वाढला असून, या परिस्थितीत नागरिकांनी आपला देय असणारा घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम तत्काळ भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. घरफाळा वसुलीचे काम नियंत्रण अधिकारी तथा उपआयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विनायक औंधकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गतीने सुरू ठेवले आहे.दोन टक्के दंडाची आकारणी सुरूघरफाळ्याच्या थकीत रकमेवर दि. १ डिसेंबर २०२० पासून दोन टक्के दंडाची आकारणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरफाळ्याची रक्कम तत्काळ भरून जप्ती, तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.

टॅग्स :Taxकरkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका