शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरच्या टंचाईमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घरगुती, व्यावसायिक आणि शेती पंपासाठी नवीन कनेक्शन सुरू करताना लागणाऱ्या वीज मीटरची राज्यात ...

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : घरगुती, व्यावसायिक आणि शेती पंपासाठी नवीन कनेक्शन सुरू करताना लागणाऱ्या वीज मीटरची राज्यात गेल्या महिन्याभरापासून टंचाई असल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. गेली अनेक वर्षे रखडलेली कनेक्शन मिळायला आता कुठे सुरुवात झाली असताना ते कनेक्शन मीटर नसल्याने सुरू होण्यात अडचणी आहेत. राज्यात सिंगल फेजची व थ्री पेजची महिन्याला किमान ९० हजार नवीन मीटरची गरज असते.

‘लोकमत’ने शुक्रवारी महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी नागरिकांनी स्वत:हून बाजारातून मीटर विकत घेऊन त्याची महावितरणकडे चाचणी करून घ्यावी व ते मीटर बसवून घ्यावे, असे सुचविले. परंतु बाजारातही ही मीटर सहजासहजी उपलब्ध नाहीत. राज्यात सिंगल फेजची अडीच लाख मीटर शिल्लक असल्याचे त्यांच्या कागदोपत्री रेकॉर्ड‌वरून दिसते. परंतु, प्रत्यक्षात लोकांना मात्र मीटर मिळत नाहीत म्हणून तक्रारी आहेत. सध्याच्या मीटरचे दरमहा रीडिंग घेताना प्रत्येक मीटरची जाग्यावर जाऊन नोंद घ्यावी लागते. घर बंद असेल तर पुन्हा हेलपाटे होतात. त्यात मनुष्यबळ आणि वेळेचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी आता रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. महावितरणची मोबाईल व्हॅन एका गल्लीतून गेल्यावर त्या गल्लीतील सर्व मीटरचे बिलिंग त्यामध्ये नोंद होईल. आता नवीन कनेक्शनसाठी हीच मीटर बसविण्यात येणार आहेत. अशी राज्यभरात २० लाख मीटर बसविण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थ्री फेजची २ लाख मीटर मागविली असून, ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील. सिंगल फेजची मीटर मिळण्यास कदाचित महिनाभर लागेल असे महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

मधला मार्ग..

महावितरणचे कनेक्शन मिळतानाच ग्राहकाला मोठ्या दिव्यांतून जावे लागते. आता ते कनेक्शन जोडले आहे; परंतु मीटरअभावी वीज पुरवठा सुरू करता येत नाही अशी स्थिती आहे. त्यातून मार्ग म्हणून कृषी पंपांना अश्वशक्तीप्रमाणे बिल आकारणी करून ही कनेक्शन मीटर न बसविताच सुरू करण्यात येत आहेत.

उत्पन्न थांबले..

नवीन कनेक्शनमुळे महावितरणचे उत्पन्न वाढणार आहे. परंतु, तरीही मीटर लवकर उपलब्ध करून देण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा अनुभव येत आहे.

मीटर अशी असतात..

सिंगल फेज : मुख्यत: घरगुती ग्राहकांसाठी - किंमत सरासरी १००० रुपये

थ्री फेज : औद्योगिक, व्यापारी, मोठ्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टसाठी व शेती पंपासाठी : किंमत सरासरी-१५००

फोटो : २९०१२०२१-कोल-रेडिओ मीटर