शेंडापार्कातील ७५ एकर जागेत कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 04:47 PM2018-02-14T16:47:07+5:302018-02-14T16:51:56+5:30

कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा मुक्रर करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीमुळे

Circuit Bench of 75 acres of land in Shendaparka, Chief Minister's delegation assures | शेंडापार्कातील ७५ एकर जागेत कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

शेंडापार्कातील ७५ एकर जागेत कोल्हापूरचे सर्किट बेंच, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन १00 कोटींची तरतूद करणार

कोल्हापूर : कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा मुक्रर करण्याचे आदेश दिले आहेत. 

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरातील सर्किट बेंचसंदर्भात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर फडणवीस यांनी सर्किट बेंचच्या निर्मितीला मान्यता दिली.

मुंबई उच्च न्यायालयात नवीन मुख्य न्यायाधीश हजर झाल्यानंतर त्यांची भेट घेवून हे सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी शासन तयार असल्याबाबत तसेच हे बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाने मागणी केलेले पत्र त्वरित देतो असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

फडणवीस यांनी यावेळी कोल्हापूरातील या प्रस्तावित सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्याबाबत विधी व न्याय खात्याच्या सचिवांना आदेश दिले. या सर्कीट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांनी ११२0 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी येत्या अर्थसंकल्पात १00 कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याचे आश्वासनही बुधवारी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात बुधवारी कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्कीट बेंच कोल्हापूरातच व्हावे अशीच शासनाची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.

या शिष्टमंडळात सर्वपक्षीय नागरी खंडपीठ समिती आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक प्रशांत शिंदे, सेक्रेटरी किरण पाटील, सातारा व सांगली बार असोशिएनचे पदाधिकारी, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे माजी चेअरमन महादेवराव आडगुळे, बार असोचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, माजी सेक्रेटरी व्ही. आर. पाटील तसेच खंडपीठ नागरी कृती समितीचे बाबा पार्टे आणि जयकुमार शिंदे तसेच करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: Circuit Bench of 75 acres of land in Shendaparka, Chief Minister's delegation assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.