शिरगाव येथे चुरशीची दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:54+5:302021-01-13T04:59:54+5:30
सरुड : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील ग्रा. पं. निवडणुकीत नऊ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून येथे दोन ...

शिरगाव येथे चुरशीची दुरंगी लढत
सरुड : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील ग्रा. पं. निवडणुकीत नऊ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून येथे दोन आघाड्यांमध्ये चुरशीने दुरंगी सामना होत आहे. या ठिकाणी सत्तारूढ जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडी विरोधात तीन गट मोठया ताकदीने उभे ठाकले आहेत.
शिरगाव ग्रामपंचायतीवर सध्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर गटाच्या २५ वर्षांच्या वर्चस्वाला हादरा देत जनसुराज्य शक्ती पक्ष व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड गटाच्या युतीने या ग्रा. पं. वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते; परंतु सध्या या निवडणुकीत येथील कर्णसिंह गायकवाड गटाने जनसुराज्य पक्षाशी फारकत घेत माजी आमदार सत्यजित पाटील गटाशी संधान बांधले आहे. तसेच उदय साखरचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा गटही त्यांच्यासोबत आहे. या तिन्ही गटांनी एकत्रित येत श्री निनाईदेवी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत, तर विरोधी जनसुराज्य शक्ती पक्षानेही एकाकी लढत देत श्री निनाईदेवी युवा ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात उतरविले आहेत. दोन्ही आघाड्यांनी तोडीस तोड उमेदवार दिले आहेत. त्यामुळे सर्वच प्रभागांत रंगतदार लढती होत आहेत. सत्तारूढ जनसुराज्य आघाडीचे नेतृत्व उपसरपंच रवींद्र यादव, संभाजी भोसले हे करत आहेत, तर विरोधी श्री निनाईदेवी ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व ‘विश्वास’चे संचालक मारुती आबा पाटील, भगवान पोवार, बाबासो नांगरे-पाटील, वसंत सावंत, तुकाराम पाटील, आदी करत आहेत.
x चौकट X एकूण मतदार - २३०६ एकूण प्रभाग - ३ एकूण सदस्य संख्या - ९
उमेदवार - १८