शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’ची निवडणूक लावा, अन्यथा उपोषण

By admin | Updated: July 14, 2015 23:55 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कुंभी-कासारी बचाव मंचचा इशारा

कोल्हापूर : संचालक मंडळाची मुदत संपलेल्या कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या, गुरुवारपर्यंत जाहीर न झाल्यास शुक्रवारी (दि. १७) कारखान्याचे सभासद उपोषणाला बसतील, असा इशारा कुंभी-कासारी बचाव मंचने दिला आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना भेटून कारखान्याच्या सभासदांनी यासंदर्भात निवेदन दिले. कुंभी-कासारी बचाव मंचचे एक शिष्टमंडळ मंगळवारी जिल्हाधिकारी सैनी यांना भेटले. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, यासाठी काही सभासद सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून कारखान्याची पक्की सभासद यादी १९ जूनला प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुुळे २८ जूनपर्यंत तारीखवार निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे आवश्यक होते, पण त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही. अनेकवेळा मागणी करूनही शासकीय अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे सभासदांच्या न्याय हक्कांना महत्त्व दिले जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जर उद्यापर्यंत कार्यक्रम जाहीर केला नाही, तर मात्र दुसऱ्याच दिवसापासून उपोषण करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाजीराव खाडे, कृष्णात पाटील, संजय पाटील, संजय जोतिराम पाटील, कृष्णात चाबुक, सज्जन पाटील, बाजीराव पाटील, पोपट पाटील, स्वरूप पाटील, प्रल्हाद मर्दाने, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)