दिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:19 IST2019-01-08T11:18:19+5:302019-01-08T11:19:33+5:30

कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थिनी आहे. ‘लोकमत’ कोल्हापूरचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी यांची ती कन्या आहे.

The choice of Devyani Joshi for the Delhi operation | दिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवड

दिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवड

ठळक मुद्देदिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवडराष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थिनी आहे. ‘लोकमत’ कोल्हापूरचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी यांची ती कन्या आहे.

तिने यापूर्वी रांची येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सूवर्णपदक व राज्यशासन राज्यस्तरीय रंगवैखरी नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. ती सध्या कलाशाखेत द्वितीय वर्षात शिकते. पंजाब येथे झालेल्या असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या नॅशनल प्रेझेंटेशन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

दिल्ली येथील प्रजासत्ताक कॅम्पसाठी राज्यातून १११ विद्यार्थ्यांची निवड होते, त्यात तिचा समावेश झाला आहे. तिला कर्नल सर्वश्री जे. सी. सायकीया, सी. डिसील्वा, सांघा जी. सी. आय निशा भोसले, सुनीता भोसले, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे मार्गदर्शन व आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले.
 

 

Web Title: The choice of Devyani Joshi for the Delhi operation