कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे एमडी चिटणीस यांना बेदम मारहाण

By पोपट केशव पवार | Updated: January 2, 2024 23:02 IST2024-01-02T23:01:31+5:302024-01-02T23:02:17+5:30

या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला

Chitnis, MD of Rajaram Factory was brutally beaten in Kolhapur | कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे एमडी चिटणीस यांना बेदम मारहाण

कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे एमडी चिटणीस यांना बेदम मारहाण

पोपट पवार 

कोल्हापूर : केवळ विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळितासाठी जाणूनबुजून नेला जात नाही. नवीन ऊस नोंदी करत नाहीत, या कारणास्तव मंगळवारी (दि. २) सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस (रा. हुपरी) यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.  

या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला. कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमल महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

Web Title: Chitnis, MD of Rajaram Factory was brutally beaten in Kolhapur