कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचे दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:57 IST2025-05-14T18:57:09+5:302025-05-14T18:57:32+5:30
कोल्हापूर : राजारामपुरी डेपोतील वृत्तपत्र विक्रेते संदीप टोपकर (उंचगाव) यांची कन्या समृद्धी टोपकर हिने दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण ...

कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचे दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश
कोल्हापूर : राजारामपुरी डेपोतील वृत्तपत्र विक्रेते संदीप टोपकर (उंचगाव) यांची कन्या समृद्धी टोपकर हिने दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवले. विक्रेते रवींद्र खोत यांचा मुलगा वेदांत खोत याने दहावी परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. या दोघांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवले.
समृद्धी उचगावातील डी. के. व्ही. एन हायस्कूलमध्ये शिकत होती. तिने दहावी परीक्षेत चमकदार यश मिळवले. खोत यांचा मुलगा वेदांत हा शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर शाळेत होता. कोल्हापूर राजारामपुरीतील आईच्या पुतळ्याजवळील पेपर स्टॉलवर तो रोज सकाळी पेपर विक्रीच्या कामाला मदत करणे तसेच राजारामपुरी, सम्राटनगर या परिसरात घरोघरी पेपर टाकून अभ्यास केला. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि हे लखलखीत यश मिळवले.