कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे रयत क्रांती संघटनेतर्फे आयोजित ऊस परिषदेला येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याने सभास्थळी पोेचण्यासाठी त्यांना उशीर झाला.मुख्यमंत्री फडणवीस कवलापूर-सांगली येथील कार्यक्रम आटोपून कोडोली येथील ऊस परिषदेला येण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. वैमानिकाला वारणा-कोडोली दिशेचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळ परिसरात आले. या ठिकाणी ते काहीकाळ हवेतच घुटमळले. हेलिकॉप्टर कोल्हापूरच्या दिशेने आल्याचे समजताच बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस प्रशासनाने धावपळ करीत विमानतळ गाठले.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:58 IST