शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:52 IST

हद्दवाढ, खंडपीठ असे सर्व प्रश्न सुटणार

कोल्हापूर : या देशासाठी मराठा समाजाने दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे कोणा अधिकाऱ्याकडून केलेले आक्षपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. ते स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबाबत दोनच दिवसांत निर्णय घेतील, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. रविवारी सकल मराठा समाज बांधवानी क्षीरसागर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या विधानाबद्दल माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते.क्षीरसागर म्हणाले, लोकांच्या हितासाठी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही जाती - धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करू नये. जर जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलेल्या वक्तव्यांची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही गांभीर्याने विचार केला असून दोन दिवसांत त्यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे.क्षीरसागर पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मोर्चातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रभागी होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने ते झटत आहेत. आरक्षण प्रश्नी लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील सकल मराठा समाज बैठक घडवून आणू.ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, आरक्षण नसल्याने मराठा समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अशातच जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासारखे अधिकारी म्हणजे नाकापेक्षा मोती जड आहेत असेच म्हणावे लागेल. अशा मराठा द्वेशी अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी करावी.यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे, माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, बाबा पार्ट, संगीता खाडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

हद्दवाढ, खंडपीठ असे सर्व प्रश्न सुटणारदिवाळीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अपेक्षा चर्चेच्या अखेरीस बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली. यावर क्षीरसागर म्हणाले, कोणालाही न दुखावता हद्दवाढीचा निर्णय होणार आहे. त्याचबरोबर खंडपीठासह शहराचे महत्त्वाचे प्रश्न दिवाळीपूर्वी सुटतील.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही तक्रारमराठा आरक्षणप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाची सखोल चौकशीसह दहा दिवसांत त्यांची बदली करावी, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सकल मराठा समाज शिष्टमंडळाने शनिवारी केली.

आज पालकमंत्र्यांची भेट घेणारजिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाबद्दल आज, सोमवारी सकाळी ८ वाजता ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांची सकल मराठा समाजचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरMaratha Reservationमराठा आरक्षण