शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

पानसरे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जबाब द्यावा, कोल्हापुरात डाव्या कार्यकर्त्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:46 PM

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांना महाराष्ट्र शासन अजून पकडू शकलेले नाही. हे मारेकरी सरकारला पकडायचे आहेत की नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तारखेला कोल्हापूर दौऱ्यात द्यावे अशी मागणी डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी केली.

ठळक मुद्देज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्भय मॉर्निंग वॉकला प्रतिसादकार्यकर्त्यांच्या घोषणा देत फेरी पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना न पकडणाऱ्या भाजप सरकारचा निषेध सरकारवर रेटा वाढविण्यासाठी मंत्रालयाला घेराव

कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्र शासन अजून पकडू शकलेले नाही. हे मारेकरी सरकारला पकडायचे आहेत की नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तारखेला कोल्हापूर दौऱ्यात द्यावे अशी मागणी डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी केली.

पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील बिनखांबी गणेश मंदिरापासून ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. त्याच्या समारोपावेळी ही मागणी करण्यात आली.

मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षाचे राज्य नेते उदय नारकर म्हणाले,‘देशात व राज्यात नरेंद्र व देवेंद्र यांचे खोटी आश्वासन देवून सत्तेवर आलेले सरकार आहे. त्यांना जाती-जातीमध्ये तेढ वाढवून त्यातून राजकारण करायचे आहे. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आता तपास ठप्प झाला आहे.

सरकारला त्याचे कांही सोयरसुतक नाही. त्यामुळे सरकारवर रेटा वाढविण्यासाठी मंत्रालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करावे लागणार आहे. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री कोल्हापूरात येत आहेत. त्यांनी या हत्येच्या तपासाची सद्यस्थिती काय आहे यासंबंधीची माहिती समाजाला दिली पाहिजे.’

पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना न पकडणाऱ्या  भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत ही फेरी काढण्यात आली. त्यामध्ये सुरेश शिपूरकर, दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, प्राचार्य टी.एस.पाटील, संभाजीराव जगदाळे, सतिश पाटील, शाहीर राजू राऊत, जीवन बोडके,सीमा पाटील, तनुजा शिपूरकर, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, स्वाती कृष्णात, रमेश आपटे, धनंजय सावंत,राजाराम धनवडे, अमर माने, रवि जाधव, ए.बी.जाधव, वसंतराव पाटील, शंकर काटाळे,नवनाथ मोरे, मुन्ना सय्यद,अजित थोरात आदीसह मान्यवर सहभागी झाले.

अशाही बांधीलकी..प्रा. एन.डी. पाटील किडनीच्या आजाराने रुग्णालयात दाखल होते. नुकतेच ते औषधोपचार करून घरी आले आहेत परंतू अशा स्थितीतही या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी होवून त्यांनी वैचारिक निष्ठा व चळवळीची बांधीलकी दाखवून दिली. वॉकर घेवून चालत जावून त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा मुठी आवळून तीव्र शब्दात निषेध केला.

डिसेंबरमध्ये कसबा बावडापुढील मॉर्निंग वॉक २० डिसेंबरला कसबा बावड्यातील भगवा चौकातून काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरkolhapurकोल्हापूर