शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:32 PM

दोन दिवसांत दोन मतदारसंघांसाठी लावणार जोडण्या

कोल्हापूर : शिंदेसेनेच्या वाट्याला आलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे पाठबळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये दोन दिवस तळ ठोकणार आहेत. येत्या शनिवारी, रविवारी ते येण्याची शक्यता आहे. यात शनिवारी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे.संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्याआधी शिंदे दोन दिवसांसाठी कोल्हापूरला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचनंतर ते मुंबईला गेले होते. यावेळी त्यांनी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या घरी भेटी दिल्या. अर्ज भरण्यासाठी शिंदे १५ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक आणि समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या. महाडिक यांच्या घरात त्यांनी विविध मान्यवरांच्या स्वतंत्र आणि एक, दोघांना एकत्र घेऊन अशा बैठका केल्या. या भेटीनंतर हे सर्व जण चांगल्या पद्धतीने सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

अजूनही काही दुरुस्त्या बाकी आहेत. त्यामुळे शिंदे पुन्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये प्रमुख नेते मंडळी, सहकारी संस्थांचे प्रमुख, उद्योजक यांच्या ते भेटी घेण्याची शक्यता असून, याच गाठीभेटींच्या माध्यमातून महायुतीच्या मागे बळ उभा करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील मानेEknath Shindeएकनाथ शिंदे