शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया २६ जुलैपासून; समितीच्या बैठकीत निर्णय

By admin | Updated: July 3, 2015 01:07 IST

असा असेल कालावधी

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारा १ लाख ३५ हजारांचा धनादेश केंद्रीय पुरातत्त्व खात्याला पाठविण्याचा निर्णय गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आज, शुक्रवारी हा धनादेश देण्यात येणार आहे. यामुळे मूर्ती संवर्धनाचा मार्ग सुकर झाला असून, २६ जुलैपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेचा (केमिकल कॉन्झर्व्हेशन) पहिला टप्पा म्हणून ११ जूनला केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून हा अहवाल मंजुरीसाठी पाठविला होता. त्या अहवालाला केंद्रीय पुरातत्त्व खात्याने अंतिम मंजुरी देत प्रक्रियेसाठी येणारा १ लाख ३५ हजारांचा खर्च देवस्थानने धनादेशाद्वारे पाठवावा, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले होते. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, यावर दोन आठवड्यांत समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. (पान ९ वर)असा असेल कालावधीसध्या आषाढ महिना आणि पावसाळा सुरू असल्याने या कालावधीतच मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे.पुरातत्त्व खाते व श्रीपूजकांशी चर्चा करून २६ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीतील तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.या प्रक्रियेसाठी सहा आणि जास्तीत जास्त १० दिवसांचा कालावधी लागणार असून, ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली केली जाईल. या कालावधीत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे. मंदिर खुलेच राहणार मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू असली तरी या काळात मंदिर बंद ठेवले जाणार नाही; कारण मूर्तीवर रात्री केमिकल कॉन्झर्व्हेशन केले जाईल व दिवसभर ती दर्शनासाठी खुली ठेवली जाईल. मूर्तीवर केले जाणारे अभिषेक, अन्य धार्मिक विधी हे उत्सवमूर्तीवर केले जातील. अंबाबाई मूर्ती संवर्धनाची सुरुवात म्हणून देवस्थानकडून पुरातत्त्व खात्याला निधी पाठविण्यात येत आहे. देवस्थानची जबाबदारी इथपर्यंत होती. यापुढे पुरातत्त्व खाते ठरवील त्याप्रमाणे कार्यवाही होईल. या सगळ्या प्रक्रियेला देवस्थानचे सहकार्य असेल.- डॉ. अमित सैनी, अध्यक्ष, देवस्थान समिती