शैक्षणिक क्षेत्रात चव्हाण यांचे उल्लेखनीय कार्य : आमदार आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:31+5:302021-02-05T06:59:31+5:30
खोची : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रा. बी. के. चव्हाण यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना विकासाभिमुख कार्यासाठी सहकार्य ...

शैक्षणिक क्षेत्रात चव्हाण यांचे उल्लेखनीय कार्य : आमदार आवळे
खोची : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रा. बी. के. चव्हाण यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना विकासाभिमुख कार्यासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
खोची येथे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. बी. के. चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरात ते बोलत होते. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, पंचायत समितीचे सदस्य वसंतराव गुरव, वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील, पेठवडगावचे उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, वडगाव बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, ॲड. आर. आर. पाटील, बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण, माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, हंबीरराव जाधव उपस्थित होते.
अष्टविनायक तरुण मंडळ व श्रीकृष्ण विविध उद्योग व शिक्षण समूह यांच्यावतीने वैभव लक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर, अण्णासाहेब डांगे आयुर्वेद कॉलेज, आष्टा यांचे सहकार्य शिबिरास लाभले. यामध्ये ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. १५१ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळी - खोची येथे प्रा. बी. के. चव्हाण यांचा सत्कार आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेतन चव्हाण, एम. के. चव्हाण उपस्थित होते.