इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी फेरआरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये सहा प्रभागांतील बारा आरक्षणांमध्ये बदल झाला, तर दहा प्रभागांतील आरक्षणे ही पूर्वीप्रमाणेच कायम राहिली आहेत.महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढली होती. मात्र, तांत्रिक कारणाने पुन्हा एकदा घोरपडे नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात आली. ११ नोव्हेंबरला अनुसूचित जातीसाठी टाकलेली आरक्षणे पूर्वीप्रमाणे कायम ठेवली. सोमवारी नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १३ चिठ्ठ्यांमधून आर्वी खोंद्रे, वरद पाटील, रागिनी नेमिष्टे आदी मुलांच्या हस्ते १४ अ, ८ अ, २ अ, १३ अ आणि ७ ब या प्रभागांतील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या ५ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामुळे ६ प्रभागांतील १२ जागांमध्ये बदल झाला, तर १० प्रभागांतील ४० जागा या पूर्वीप्रमाणे कायम राहिल्या आहेत.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र, या आरक्षण सोडतीसाठी नागरिकांनी अत्यल्प उपस्थिती लावली.फेरआरक्षणामध्ये बदलले प्रभागपूर्वीचे आरक्षण - झालेला बदलप्रभाग २अ - ना.मा.प्रवर्ग - ना.मा.प्रवर्ग महिलाक- सर्वसाधारण महिला - सर्वसाधारणप्रभाग ५अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्गक - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिलाप्रभाग ७ब - ना.मा. प्रवर्ग - ना.मा. प्रवर्ग महिलाक - सर्वसाधारण महिला - सर्वसाधारणप्रभाग ११अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्गक - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिलाप्रभाग १२अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्गक - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिलाप्रभाग १४अ - ना.मा. प्रवर्ग - ना.मा. प्रवर्ग महिलाक - सर्वसाधारण महिला - सर्वसाधारण६५ प्रभागांचा लेखाजोखामहापालिका निवडणुकीसाठी ६५ प्रभाग आहेत. त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी २१, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ९ व अनुसूचित जाती महिलांसाठी ३ अशा ३३ जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर उर्वरितपैकी ३ जागा अनुसूचित जाती, ८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व २१ जागा सर्वसाधारणसाठी आहेत.
Web Summary : Recast ward reservations for Ichalkaranji Municipal elections saw changes in six wards. The draw altered reservations for Other Backward Classes and general category seats. Ten wards' reservations remained unchanged. This redrawing impacts upcoming election dynamics.
Web Summary : इचलकरंजी नगर पालिका चुनावों के लिए वार्ड आरक्षण में बदलाव किया गया, जिससे छह वार्ड प्रभावित हुए। आरेखण ने अन्य पिछड़ा वर्ग और सामान्य श्रेणी की सीटों के लिए आरक्षण बदल दिया। दस वार्डों का आरक्षण अपरिवर्तित रहा। इससे आगामी चुनाव प्रभावित होंगे।