शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मंत्री सतेज पाटील यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:54 IST

भाजपची पायाखालची वाळू घसरली. निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आले आहे.

कोल्हापूर : तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळेच शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला हे अख्ख्या जिल्ह्याने बघितले आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध रहावे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. या टीकेला मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर देत भापजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.भाजपची पायाखालची वाळू घसरली आहे. निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते माझ्यावर वैयक्तीक पातळीवर टिका करत आहेत. २०१९ च्या सुमारास भाजप आणि शिवसेना यांची युती होती. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. शिवसेनेच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला हे जिल्ह्याने बघितले आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना