Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:52 IST2019-10-11T17:27:38+5:302019-10-11T18:52:34+5:30
खासदार संजय मंडलिक यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी युतीधर्म पाळावा आणि भाजपसोबत रहावे, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना इशारा
कोल्हापूर : आम्ही साधे-भोळे आहोत असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे की भले भलही आम्हाला घाबरतात. खासदार संजय मंडलिक यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी युतीधर्म पाळावा आणि भाजपसोबत रहावे, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला.
मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे, कारण शिवसेनेला जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पालकमंत्र्यांनी करुन दिली.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला.
सोयीचे खोटे राजकारण करणारे संपणार आहेत अडगळीत पडणार आहेत याची जाणीव झाली म्हणूनच कॉँग्रेस नेत्यांची तरुण मंडळी पटापट बाहेर पडून भाजपमध्ये येत आहेत. म्हणूनच मंडलिकांनी खोटे राजकारण सोडून प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी संदेश कचरे, उत्तम कांबळे, राहूल चिकोडे, महेश जाधव, आमदार अमल महाडिक, भगवान काटे, दौलत देसाई यांची भाषणे झाली.