शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; २४११ क्युसेक विसर्ग सुरू, सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:15 IST

एम. एम. गुरव शित्तुर वारुण : धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी ...

एम. एम. गुरवशित्तुर वारुण : धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी सकाळी ११. ४५ मिनिटांनी धरण दरवाजामधून १५०० व विद्युत निर्मितीमधून ९११ असा एकूण २४११ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.चांदोली येथील पर्जन्य मापक केंद्रावर गेल्या २४ तासात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण १००० मिलिमीटर पाऊस झाला आहे.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. धरणात १५९२६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात २७.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून कोकरूड रेठरे  बंधारा गेले आठ दिवस पाण्याखाली गेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले मोठ्या  प्रवाहित झाले आहेत. वारणा नदी तुडूब भरून वाहत असल्याते कोकरूड रेठरे  बंधाऱ्याहून नदीचे पाणी वाढू लागल्याने शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील रेठरे, वारणा, कोडोली, मालेवाडी, जोंधळेवाडी, गोंडोली या गावांना जाणारी वाहतूक गेली पाच दिवस बंद झाली आहे.यामुळे नागरिकांना तुरुकवाडी (ता शाहुवाडी) मार्गे  प्रवास करावा लागत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दहा ते बारा किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वारणा काठावरील शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदी