शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

संधी चंदगड की गडहिंग्लजला?

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

घरटी प्रचारावर भर : बहुरंगी लढतीच्या फायद्यासाठी रस्सीखेच

राम मगदूम =--- गडहिंग्लज अपेक्षेप्रमाणे बहुरंगी लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. त्यानंतरचा आठवडा ‘जोडणी’तच गेला. संभाव्य जोडण्या झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. घरटी प्रचार, पदयात्रा आणि बैठका व कोपरा सभा यावरच प्रमुख उमेदवारांचा भर आहे. जाहीर प्रचारांच्या तोफा अजून धडाडणार असल्या तरी बहुरंगी लढतीचा फायदा उठविण्यासाठीच रस्सीखेच सुरू आहे.संध्यादेवी कुपेकरांची उमेदवारी दाखल करण्यासाठी आर. आर. पाटील येऊन गेले. त्यांच्या पहिल्याच सभेने ‘राष्ट्रवादी’ला ऊर्जा मिळाली. त्यानंतर संध्यादेवी व त्यांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. डॉ. नंदिनी यांनीही यावेळी जयवंतराव शिंपी, प्रकाशराव चव्हाण, प्रकाश पताडे व सोमगोंडा आरबोळे यांची मदत मिळवली आहे. संग्रामसिंह यांचे सख्खे बंधू रामराजेदेखील त्यांच्यासोबत आहेत.संग्रामसिंह कुपेकरांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून ‘जनसुराज्य’ची उमेदवारी मिळवली; परंतु यापूर्वी जनसुराज्यतर्फे लढलेले गोपाळराव पाटील व प्रकाशराव चव्हाण आणि शिंपी गट त्यांच्या हाती लागला नाही. जनसुराज्यचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी गडहिंग्लजमध्ये खास बैठका घेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. १४ वर्षांचा राजकीय विजनवास संपवून नरसिंगराव व गोपाळराव एकत्र आले आहेत. सेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या नरसिंगराव पाटील यांना नेसरीच्या शाहू आघाडीतील हेमंत कोलेकर व महादेव साखरे यांची साथ मिळाली. त्यानंतर आजरेकरांसह गडहिंग्लजकरांची मते मिळविण्यासाठी त्यांची व्यूहरचना सुरू आहे.राष्ट्रवादीचे दुसरे बंडखोर अप्पी पाटील हे जि. प. सदस्य आणि गडहिंग्लज कारखान्याचे संचालक आहेत. ‘आपल्या समाजा’च्या मतांसह अन्य मतांच्या बेरजेसाठी त्यांनीही जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत असणारे गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी संध्यादेवींना पाठिंबा दिला तरी संचालक भैरू पाटील-वाघराळकर हे त्यांच्यासोबत आहेत. ‘गोकाक’चे पाहुणे जारकीहोळी बंधूंची ‘रसद’ मिळाल्यामुळे त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यांची बंडखोरी राष्ट्रवादीला डोकेदुखीची ठरली आहे.काँगे्रसची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यानंतर भरमूअण्णा पाटील यांनी काँगे्रसच्या पारंपरिक मतांसाठी काँगे्रसजनांची मदत मिळविण्यासाठी ताकद लावली आहे. जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी यांचा प्रचार ‘एकला चलो रे’ सुरू आहे.‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर यांनाही नितीन पाटील यांच्या बंडखोरीचा फटका बसला आहे. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी एका धावत्या प्रचार दौऱ्याने स्वाभिमानी टीमला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चंदगडची आमदारकी चंदगडला जाणार की गडहिंग्लजमध्ये राहणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. चंदगडएकूण मतदार २,९७,७४२ प्रचारातील मुद्देवाढती बेरोजगारीबंद स्थितीतील दौलत कारखानावादग्रस्त एव्हीएच प्रकल्प‘काजू’चा हमीभावपर्यटन क्षेत्र विकासकुणाबरोबर कोण ?संध्यादेवी कुपेकर - जयवंत शिंपी, प्रकाशराव चव्हाण, सोमगोंडा आरबोळे, प्रकाश पताडेनरसिंगराव पाटील - गोपाळराव पाटील, हेमंत कोलेकर, महादेव साखरेअप्पी पाटील - भैरू पाटील-वाघराळकर