सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे जिल्ह्यात शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:42+5:302021-04-05T04:21:42+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना संसर्गाने शतक ठोकले असून रविवारी १६१ रुग्ण नव्याने आढळून आले, तर ...

Century in the district of Corona for the fourth day in a row | सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे जिल्ह्यात शतक

सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे जिल्ह्यात शतक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना संसर्गाने शतक ठोकले असून रविवारी १६१ रुग्ण नव्याने आढळून आले, तर तीन रुग्णांचा ‘सीपीआर’मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत झालेले दोन रुग्ण कोल्हापूर शहरातील असून एक रुग्ण सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील आहे.

रविवारी आढळून आलेल्या १६१ कोरोना रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक ६९ रुग्णांचा तर शहराला लागून असलेल्या करवीर तालुक्यातील २१ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल नगरपालिका हद्दीत १७, भुदरगड तालुक्यात १०, हातकणंगले तालुक्यात नऊ, कागल तालुक्यात सात, शाहूवाडी तालुक्यात तीन, पन्हाळा व गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी दोन तर आजरा व राधानगरी तालुक्यात प्रत्येक एक रुग्ण आढळला. गेल्या काही दिवसांपासूनची आकडेवारी पाहता कोल्हापूर शहराबरोबरच पुन्हा एकदा ग्रामीण भागात कोरोना आपले पाय पसरत असल्याचे लक्षात येते.

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ‘आरटीपसीआर’च्या ३२५ चाचण्या झाल्या. त्यापैकी १७७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर ५६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच १५६ व्यक्तींच्या ॲन्टिजेन चाचण्या झाल्या, त्यापैकी १४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. खासगी रुग्णालयातील लॅबमध्ये ४४३ चाचण्या झाल्या, त्यापैकी ३४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ९६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापुरातील दोघांचा मृत्यू -

कोल्हापूर शहरातील सोमवार पेठ येथील ८६ वर्षीय महिलेचा तर कसबा बावडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील कडेगावचा ६५ वर्षीय पुरुषाचाही सीपीआर मध्ये मृत्यू झाला.

एक हजारावर कोरोना बाधितांवर उपचार -

गेल्या चार दिवसांपासून शंभरच्या पुढे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाने गती घेतल्याची जाणीव होत आहे. चार दिवसात पाचशे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण १०८६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

संक्षिप्त माहिती -

- एकूण रुग्णांची संख्या - ५२,६४३

- बरे झालेल्या रुग्णांची संख्या - ४९,७७३

- आतापर्यंतचे मयत संख्या - १७८४

- उपचार घेत असलेले रुग्ण - १-८६

Web Title: Century in the district of Corona for the fourth day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.