शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासन ऊसदर स्थिरता निधी स्थापन करणार; अभ्यासासाठी समिती : साखर दरातील चढ-उतारावर उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर अनिश्चित, मात्र शेतकऱ्यांना देय असणारी एफआरपी मात्र चौदा दिवसांत कायद्याने देणे बंधनकारक, अशा ...

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर अनिश्चित, मात्र शेतकऱ्यांना देय असणारी एफआरपी मात्र चौदा दिवसांत कायद्याने देणे बंधनकारक, अशा कोंडीत सापडलेल्या देशभरातील साखर उद्योगाला या आर्थिक अस्थिरतेतून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरुपी ऊसदर स्थिरता निधी उभा करता येईल का, असा विचार केंद्र शासनाच्या पातळीवर गांभीर्याने सुरू झाला आहे. त्यासाठी या उद्योगाशी संबंधित पाच प्रमुख मंत्र्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली असून, तिची बैठकही झाली आहे.

सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर व उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून ७० टक्के शेतकऱ्याला व ३० टक्के कारखान्यांस असे सूत्र निश्चित झाले. परंतु मागील तीन-चार हंगामात साखरेचे दरच कमी राहिल्याने ७० टक्के रकमेतून एफआरपीही भागू शकली नाही. म्हणून ती देण्यासाठी केंद्र शासनाला कारखान्यांना कर्जे देण्याची पाळी आली. हे टाळण्यासाठी स्थिरता निधी व एफआरपी टप्प्याटप्याने देता येईल का, असाही विचार सुरू झाला आहे.

बाजारातील साखरेचा दर हा महागाई निर्देशांकाशी जोडलेला असल्याने साखर वाढली की निर्देशांक उसळी घेतो व त्यातून मध्यमवर्गीयांची नाराजी वाढते, म्हणून साखरेचा दर केंद्र सरकार वाढू देत नाही. त्याचा फटका देशभरातील साखर उद्योगाला बसतो. साखरेला चांगला दर मिळाल्याशिवाय उसाची एफआरपी देता येत नाही. अशा स्थितीतून मार्ग म्हणून केंद्र शासनाने साखरेचा कारखान्यांकडील खरेदी दर ३१ रुपये केला; परंतु तरीही त्यातून प्रश्र्न सुटलेला नाही. हा दर किमान ३८ रुपये करावा, अशी मागणी आहे परंतु केंद्राची त्यास तयारी नाही. मग सध्या मिळत असलेल्या दरातून कारखान्यांना उसाची एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही. त्यामुळे जेव्हा अशी स्थिती निर्माण होईल, तेव्हा एफआरपी देण्यासाठी कमी पडत असलेली रक्कम या स्थिरता निधीतून देता यावी, असाहा विचार आहे.

निधी कसा उभा करणार..

हा निधी कसा उभा करणार, यासंबंधी केंद्र शासनाने अजून काही विचार केलेला नाही. पूर्वी जीएसटीच्या अगोदर प्रतिक्विंटल ८५ रुपये अबकारी कर घेतला जात होता. त्यातील २४ रुपये साखर विकास निधीत व उर्वरित ६१ रुपये केंद्र शासनाला करापोटी मिळत होते. आता ५ टक्के जीएसटी लागू झाल्यापासून ही वसुली बंद झाली. याशिवाय आणखी ५ टक्के अधिभार लावून त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून हा निधी उभा करता येऊ शकतो.

समितीत कोण..

स्थिरता निधीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या समितीत कृषी, अन्न व प्रक्रिया उद्योग, वाणिज्य, वित्त आणि पेट्रोलियम मंत्री यांचा समावेश आहे. त्याशिवाय नीती आयोगाचा व प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी असतील.

उताऱ्यानुसार दर

दूध उद्योगात शेतकऱ्यांना दुधाच्या फॅटप्रमाणे बिल दिले जाते. तशा पध्दतीने उसाची एफआरपीही संबंधित शेतकऱ्याने कारखान्यास पुरविलेल्या उसाचा उतारा पाहून त्यानुसार देता येईल का, असाही विचार सुरू झाला आहे. परंतु त्यात अडचणीच जास्त दिसतात. आता हंगामाची सरासरी काढून त्यानुसार उतारा निश्चित केला जातो. सुरुवातीचे दोन महिने उतारा कमी असतो व शेवटच्या महिन्यात तो वाढतो.

साखर विकास निधी

यापूर्वी केंद्र शासनाच्या साखर विकास निधीतून मुख्यत: ऊस विकास योजना, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, डिस्टिलरी प्रकल्प यासाठी कारखान्यांना भरीव मदत मिळत असे. अलिकडील काही वर्षांत निर्यात अनुदानही याच निधीतून दिले गेले. याच धर्तीवर नवा ऊसदर स्थिरता निधी असू शकेल.