शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला केंद्राची साथ खेदाची

By admin | Updated: October 19, 2014 00:41 IST

विचारवंतांची प्रतिक्रिया : मराठी भाषिक संतप्त

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी केंद्रातील सरकार कर्नाटकला साथ देऊन बेळगावचे बेळगावी करण्याला मंजुरी दिली आहे, ही खेदाची बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विचारवंतांनी व मराठी भाषिकांनी व्यक्त केल्या. निपाणी, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठीबहुल अशी ८१४ गावे महाराष्ट्रात येण्यास अनेक वर्षांपासून उत्सुक आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाहीचे सर्व मार्ग यासाठी अवलंबले. तरीही सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. कर्नाटक शासन सीमाभागातील मराठी भाषिकांची संधी मिळेल त्यावेळी गळचेपी करीत आहे. कन्नडची सक्ती करीत आहेत. कानडीकरणाचाच एक भाग म्हणून कन्नड उच्चाराप्रमाणे बेळगावचे बेळगावी असे नामातंर करण्याचा घाट केला. सन २००६ केंद्राकडे प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने बेळगावसह ११ शहरांची नावे बदलण्यासाठी मंजुरी दिली. यावर सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शहर शिवसेनेतर्फे केंद्राच्या ‘बेळगावी’च्या निर्णयाविरोधी छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र शासनाच्या बेळगावीच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, मंदार तपकिरे, शिवाजी जाधव, ईश्वर घाडगे, रणजित जाधव, विजय कुलकर्णी, राज जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना केंद्रातील भाजप सरकार बेळगावी करण्याला मंजुरी देऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. बेळगावी करण्याला मंजुरी देऊन कर्नाटकला केंद्र शासनाने चिथावणी दिली आहे, ही खेदाची गोष्ट आहे. बेळगावी करण्याच्या निर्णयामुळे भाजपचा व्यवहार मात्र उलटा असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)