जनगणनेमध्ये आम्ही ‘लिंगायत’ धर्म लिहिणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST2021-02-06T04:45:53+5:302021-02-06T04:45:53+5:30
समाजाला योग्य ते समजावून सांगणार लिंगायत समाजाचा विकास, मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने योग्य काय आहे. समाजाचा केवळ धार्मिकच नव्हे, तर ...

जनगणनेमध्ये आम्ही ‘लिंगायत’ धर्म लिहिणार
समाजाला योग्य ते समजावून सांगणार
लिंगायत समाजाचा विकास, मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने योग्य काय आहे. समाजाचा केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक विकासासाठी जे योग्य आहे. ते प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत आम्ही समजावून सांगणार असल्याचे सरलाताई पाटील यांनी सांगितले.
प्रबोधन मेळाव्यातील मागण्या
१) लिंगायत हा स्वतंत्र धार्मिक समुदाय असून, त्यास अल्पसंख्यांक समुदाय म्हणून गणले जावे.
२) लिंगायतांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व, तर सरकारी नोकरीमध्ये सवलती मिळाव्यात.
३) संविधान रचना समितीत लिंगायतांना प्रतिनिधित्व मिळावे.
४) जनगणनेच्या अर्जामध्ये लिंगायत या नावाने स्वतंत्र कोडनंबर मिळावा.
फोटो (०५०२२०२१-कोल-लिंगायत समाज मेळावा) : कोल्हापुरात शुक्रवारी लिंगायत समाज संस्थेच्या प्रबोधन मेळाव्यात जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार, असा निर्धार करण्यात आला. यावेळी शिवानंद हैबतपुरे, प्रदीप वाले, प्रकाश शेंडगे, सरलाताई पाटील, मिलिंद साखरपे, शिवराज पाटील, प्रसाद खोबरे, आदी उपस्थित होते.
फोटो (०५०२२०२१-कोल-लिंगायत समाज मेळावा ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी लिंगायत समाज संस्थेच्या प्रबोधन मेळाव्यात ॲड. शिवानंद हैबतपुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून रंजना तवटे, बाबूराव तारळी, मिलिंद साखरपे, प्रदीप वाले, सरलाताई पाटील, राजशेखर तंखाके, आदी उपस्थित होते.