बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 18:38 IST2020-11-11T18:34:26+5:302020-11-11T18:38:58+5:30
Bjp, Bihar Assembly Election 2020, kolhapur संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बिहार आणि पोटनिवडणुकीतील यशाबद्दल कोल्हापूर महानगर भाजपच्या वतीने बुधवारी कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील बिंदू चौकामध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजप नेते, कार्यकर्ते जमा झाले. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो... नरेंद्र मोदी जैसा हो, भारतमाता की जय ! अशा घोषणा देत, हलगीच्या ठेक्यावर नृत्य करीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप विरुद्ध सर्वजण असे वातावरण तयार केले जात असताना बिहारचा विजय महत्त्वाचा आहे. पोटनिवडणुकांमध्येही भाजपने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे, याचे हे प्रतीक आहे.
यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, विजय अग्रवाल, चिटणीस प्रदीप उलपे, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.