महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 19:01 IST2021-05-14T18:59:43+5:302021-05-14T19:01:15+5:30

Religious programme Kolhapur : वीरशैव लिंगायत समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पध्दतीने आणि साधेपणाने शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे शुक्रवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष यावेळी करण्यात आला.

Celebrate Mahatma Basaveshwar Jayanti with simplicity | महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी

कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनिल गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, सतिश खोतलांडे, किरण व्हनगुत्ते, अशोक माळी, शिवानंद बनछोडे, दिलीप गवळी, चंद्रकांत नासीपुडे, शिवकुमार हिरेमठ, आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना वीरशैव लिंगायत समाज बांधवांकडून घरातूनच अभिवादन

कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पध्दतीने आणि साधेपणाने शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे शुक्रवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष यावेळी करण्यात आला.

येथील दसरा चौकातील चित्रदुर्ग मठामध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा करण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.

बसव पुरस्कार प्राप्त समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, राहुल नष्टे यांचा पालकमंत्री पाटील आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे, सचिव राजू वाली, राजेश पाटील (चंदूरकर), ॲॅड. सतीश खोतलांडे, किरण सांगावकर, माळी समाजाचे अध्यक्ष अशोक माळी, तेली समाजाचे अध्यक्ष गजानन सावर्डेकर, गवळी समाजाचे अध्यक्ष दिलीप गवळी, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, किरण व्हनगुत्ते, केतन तवटे, राहुल नष्टे, चंद्रकांत नासीपुडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाक्षी कदम, उपाध्यक्षा सुनिता शेटे, माधवी बोधले, अमृता करंबळी, सविता सन्नकी, सुजाता विभुते, बी. एस. पाटील उपस्थित होते.

 

Web Title: Celebrate Mahatma Basaveshwar Jayanti with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.