शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
5
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
6
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी ती म्हणाली 'हो',तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
7
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
8
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
9
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
10
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
11
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
12
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
13
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
14
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
15
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
16
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
17
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
18
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
19
रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
20
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
Daily Top 2Weekly Top 5

SSC, HSC Exam: बोर्ड परीक्षेसाठी यंदा ३२४ केंद्रांच्या वर्गखोलीत सीसीटीव्हीतून देखरेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:55 IST

उर्वरित २१५ केंद्रांवर दहा दिवसांत बसवणार कॅमेरे : केंद्रसंचालक, कर्मचाऱ्यांची अदलाबदल

कोल्हापूर : दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील एकूण ५३९ परीक्षा केंद्रांपैकी ३२४ केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीचे हॉल तिकीट आज, सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. यंदाच्या बोर्ड परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. उर्वरित २१५ केंद्रांवर दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. विभागस्तरावर ९,७४६ वर्गखोल्यांची आवश्यकता असून पैकी ४,०२६ खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे प्रमाण ६६ टक्के आहे.प्रत्येक केंद्रावरील फुटेज जतन करण्यात येणार असून संवेदनशील केंद्रांवरील ऑनलाईन फुटेज जिल्हाधिकारी आणि जिल्हा दक्षता समितीकडे दिले जाणार आहे.परीक्षा नियंत्रणासाठी राज्य व विभागीय मंडळ स्तरावर कक्ष होणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे, तसेच संबंधित केंद्राव्यतिरिक्त इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. नियोजनबद्ध परीक्षांसाठी "बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे" या पुस्तिकेची निर्मिती केल्याची माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

विभागात १० वी साठी ३६२, १२ वी साठी १७७ केंद्रेचालू वर्षी इयत्ता १० वी साठी ५ आणि १२ वी साठी १ अशी ६ केंद्र आहेत. विभागीय कार्यकक्षेत एकूण ५३९ केंद्रे असून त्यापैकी १० वी साठी ३६२, तर १२ वी साठी १७७ केंद्रे आहेत.१० वी साठी १,३२,६९१, १२ वी साठी १,१६,५३५ अर्जइयत्ता १२वी साठी २१ जानेवारी, तर १० वी साठी ३० जानेवारीपर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. १० जानेवारीअखेर विभागीय मंडळात इयत्ता १० वी साठी १,३२,६९१, तर इयत्ता १२ वी साठी १,१६,५३५ परीक्षार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे, शाळा स्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. -राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ.

English
हिंदी सारांश
Web Title : SSC, HSC Exams: CCTV surveillance in 324 classrooms for board exams.

Web Summary : Kolhapur board exams will have CCTV surveillance in 324 classrooms to ensure fair practices. 1,32,691 students applied for SSC, and 1,16,535 for HSC. Exam centers will shuffle staff to prevent misconduct.