शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर येथील बसस्थानकावर चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर वारंवार डल्ला मारण्याचे प्रकार ...

संदीप बावचे : जयसिंगपूर येथील बसस्थानकावर चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर वारंवार डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे राहिली आहे. नवीन बसस्थानकाच्या बांधकामामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे चोरट्यांना फावले असून जयसिंगपूर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील क्रांती चौकाशेजारी असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकात पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यांमुळे बसस्थानक आवारातील हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटालुटीच्या आणि चोरीच्या घटनांवर कॅमेऱ्यांमुळे आळा बसला होता. एखाद्या घटनेविषयी तातडीने प्रवाशांना फुटेज पहायला मिळत होते.

दरम्यान, नव्याने बसस्थानकाचे बांधकाम सुरू झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले आहेत. याचाच फायदा चोरटे घेत असून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुरुंदवाड येथील वृद्धेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, जयसिंगपूर येथील महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना ताजीच आहे. दागिने चोरीच्या प्रकारामुळे महिलावर्गातून भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी महिला प्रवाशांना टार्गेट केले आहे. बसमध्ये चढत असताना चोरीचा हा प्रकार घडत असल्याने महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे. बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्षाबरोबर उजव्या बाजूला जुनाच फलाट आहे. त्यामुळे तीन कॅमेरे सध्या सुरू करता येतात. कुरुंदवाड आगारप्रमुखांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

---------------- कोट - बसस्थानकाच्या बांधकामामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लावण्यात आलेले वायरिंग काढून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या बसस्थानक आवारात कॅमेरे बंद आहेत.

- किशोर शिंगाडे, वाहतूक नियंत्रण कर्मचारी कोट - बसस्थानकावरून जयसिंगपूरसह ग्रामीण भागातील प्रवासी ये-जा करतात. महिलांच्या पर्समधील अथवा गळ्यातील दागिने चोरी होत असल्याने पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त ठेवावा.

- सुरेश शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते

फोटो - ३००१२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते.