शासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:46 IST2019-06-08T18:43:26+5:302019-06-08T18:46:05+5:30
कळंबा आयटीआय येथील शासकीय निवासस्थान परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने बेडरूममधील मोबाईल व पैशाचे पाकीट असा सुमारे २० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घडला.

शासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपास
कोल्हापूर : कळंबा आयटीआय येथील शासकीय निवासस्थान परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने बेडरूममधील मोबाईल व पैशाचे पाकीट असा सुमारे २० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घडला.
संदीप गणपत चव्हाण (वय ३५, रा. पेरले, ता. कऱ्हाड , जि. सातारा) हे कळंबा आयटीआयमध्ये नोकरीला आहेत. ते येथीलच शासकीय निवासस्थानामध्ये राहतात. शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून ते अंघोळीसाठी स्नानगृहात गेले.
बाहेर आल्यानंतर बेडरूममध्ये बेडवर ठेवलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सात हजार रुपये असलेले पाकीट चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.