रस्त्यात सापडलेली रोख रक्कम, सोन्याची अंगठी केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:52+5:302021-02-05T07:02:52+5:30
कासारवाडा (ता. राधानगरी) हद्दीत सापडलेल्या पर्समधील रोख पंधरा हजार रुपये व सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी बिद्री (ता. कागल) येथील ...

रस्त्यात सापडलेली रोख रक्कम, सोन्याची अंगठी केली परत
कासारवाडा (ता. राधानगरी) हद्दीत सापडलेल्या पर्समधील रोख पंधरा हजार रुपये व सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी बिद्री (ता. कागल) येथील प्रफुल्ल गायकवाड या तरुणाने परत केली. त्यांंच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी,प्रफुल्ल हे कामानिमित्त मोटारसायकलवरून कोल्हापूरला चालले होते. कासारवाडा गावच्या हद्दीत त्यांना रस्त्याकडेला लेडिज पर्स सापडली. पर्सच्या एका कप्प्यात आयडेंटी फोटोचे कीट सापडले. त्यामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून प्रफुल्ल यांनी आपल्याला पर्स सापडल्याचे सांगितले. नाधवडे (ता.भुदरगड) येथील शिक्षक डी. एस. पाटील यांचे ते पैसे व सोन्याची अंगठी असल्याचे समजले. गायकवाड याने पाटील यांना बिद्री येथे बोलावून त्यांचा ऐवज परत केला.
यावेळी पाटील यांनी बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कमही प्रफुल्लने नाकारली. त्याच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.
फोटो ओळी -कासारवाडा (ता.राधानगरी ) हद्दीत सापडलेली पर्स डी. एस. पाटील यांना परत करताना प्रफुल्ल गायकवाड.