पन्हाळ्याजवळ दरीत कार कोसळून कारदग्याचा एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 15:20 IST2017-10-21T15:15:50+5:302017-10-21T15:20:59+5:30

पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात ४0 फूट दरीत कार कोसळून शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. या अपघातात ओंकार सुभाष कवटगे (कारदगा ता. अथणी, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.

A car collapsed in Panhala near the Panhala and killed one | पन्हाळ्याजवळ दरीत कार कोसळून कारदग्याचा एकजण ठार

पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात शनिवारी संरक्षक कठडा तोडून कार थेट ४0 फुट दरीत कोसळली आहे.

ठळक मुद्देवाघबीळ घाटात संरक्षक कठड्याला कार धडकलीकार सांगलीची, जखमीही सांगलीचेदीड महिन्यातील दुसरी घटना

कोल्हापूर, दि. २१ :  पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात ४0 फूट दरीत कार कोसळून शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. या अपघातात ओंकार सुभाष कवटगे (कारदगा ता. अथणी, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.

प्रितम जयपाल हजारे, ओंकार अशोक पवार, गोविंद अशोक कदम (रा. तिसंगी, ता. कवठे महंकाळ, जि. सांगली) अशी इतर तीन जखमींची नावे आहेत.

ही कार (एम एच १०-बी एम ००७९) सांगली येथून पन्हाळा येथे येत असताना वाघबिळ घाटातील संरक्षक कठड्याला धडकली. कार कठडा तोडून थेट सुमारे ४0 फुट दरीत कोसळली आहे. उपचारासाठी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शामराव करत आहेत.

Web Title: A car collapsed in Panhala near the Panhala and killed one