बेळगाव लोकसभेसाठी एकीकरण समितीचा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:05+5:302021-04-04T04:26:05+5:30

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर शुभम शेळके यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे. समितीच्या लढ्याच्या इतिहासात एका ...

Candidate of Unification Committee for Belgaum Lok Sabha | बेळगाव लोकसभेसाठी एकीकरण समितीचा उमेदवार

बेळगाव लोकसभेसाठी एकीकरण समितीचा उमेदवार

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर शुभम शेळके यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे. समितीच्या लढ्याच्या इतिहासात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले. त्यांचे नाव युवावर्गातून पुढे आले. आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता युवकांनी बाळगले आहे.

शुक्रवारी रात्री सर्वांत आधी शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शेळके यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. नाव अधिकृत जाहीर होताच युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम पीरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत आशीर्वाद घेतला.

फोटो : पीरनवाडी येथील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर जमलेले युवा समितीचे कार्यकर्ते.

Web Title: Candidate of Unification Committee for Belgaum Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.